
रत्नागिरी जिल्ह्यातील अॅग्रीकल्चर झोन नियमावलीच्याअंमलबजावणीला स्थगिती-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
अग्रीकल्चर झोनमुळे जिल्ह्यात घरांच्या बांधकामाला अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने अॅग्रीकल्चर झोन नियमावलीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. ग्रामीण भागात घर बांधणीचा मार्ग तूर्तास मोकळा झाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य सरकारने जिल्ह्यात अॅग्रीकल्चर झोन जाहीर केल्यानंतर त्यातील तरतुदीमुळे ग्रामीण भागात बांधकामांवर बंधने आली होती. घर बांधकामाचे प्रस्ताव कार्यालयातून प्रलंबित राहिले होते. नव्या बांधकामाला परवानगी मिळणार नसल्याने ग्रामस्थ हवालदील झाले होते.पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्ह्याचा विभागवार विकास आराखडा होईपर्यंत झोन नियमावलीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, त्या-त्या क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती यांच्या सूचनांचा अभ्यास करून आराखडा निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे आराखडा तयार करताना घरबांधणीला कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी सरकार घेणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com