
पोलिस कर्मचार्याची दुचाकी लांबणार्याच्या मुसक्या पोलिसांनी काही तासातच आवळल्या
पोलिस कर्मचार्याची दुचाकी लांबणार्याच्या मुसक्या पोलिसांनी काही तासातच आवळल्या असून तो आरोपी अमरावती येथील तडीपार असल्याची माहीती पोलिस तपासात उघड झाली असून त्याच्यावर अमरावती तसेच इतर ठिकाणी एकूण ४१गुन्हे दाखल आहेत.
अमित रामनारायण तिवारी ( रा.बंडोरा ता.जि.अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सोमवारी रात्री 10.30 वा.पोलिस कर्मचारी रोशन सुर्वे यांनी आपली यामाहा दुचाकी रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावरील प्रभू फायनान्ससमोर उभी केली होती.ती अज्ञाताने चोरुन नेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती
www.konkantoday.com