
अमावास्येच्या भरतीचा तडाखा, उधाणामुळे मिर्या बंधार्याचा काही भाग ढासळला
अमावास्येच्या भरतीच्यावेळी समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांमुळे मिर्याचा बंधारा धोक्यात आला आहे. अलावा पाटीलवाडी येथील काही भाग ढासळला आहे. अमावास्या आणि पौर्णिमा मिळून पुढील तीन महिन्यात सहावेळा भरती येणार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.यंदा मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच अमावास्येला दणका बसला आहे.
www.konkantoday.com