नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी ९ रोजी मशाल मोर्चा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनी जसाई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
यासंदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आढावा बैठक झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय सर्वपक्षीय कृती समितीने पहिल्यांदा १० जून रोजी भव्य साखळी आंदोलन केले होते तर २४ जून रोजी सिडको घेराव भव्य आंदोलन करण्यात आले. विमानतळाला दिबांचे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्रांच्या भावना तीव्र असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे.
www.konkantoday.com