चिपळूण शहरातील पूर ओसरल्यानंतरही भयानक स्थिती
चिपळूण शहरातील पूर ओसरल्यानंतर भयानक स्थिती आहे. चिपळूण येथील मुख्य बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग ढीग दिसून येत आहेत तसेच या बाजारपेठेतील ज्या दुकानांमध्ये सर्व दुकानांमध्ये पुराचे पाणी गेले होते त्यांच्या दुकानातील मालाची नासधूस झालेली आहे काही दुकानदार आपला मग किमती माल कवडीमोलाने विकताना दिसत होते जास्त करून कापड व्यापारी चप्पल विक्रेते यांनी आपल्या दुकानाबाहेर भिजलेला माल विकण्यासाठी ठेवला आहे . भिजलेला माल विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली दिसते. येथे कोरोनाचे कुठलेही नियम पाळलेले दिसत नाही. तसेच दुसर्या बाजूला ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ व किराणा चे सामान मिळते त्या बाजूला शुकशुकाट होता व रस्त्यावरती भिजलेले अन्नधान्य व इतर वस्तू रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या दिसत आहेत. दुकानदाराचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे काही दुकानदार तर चिंताग्रस्त झालेले दिसतात.ठीकठीकाणी अजून ही कचरा्याचे ढीग दिसत आहे.बाजारपेठ व बाजुच्या भागातील लोक अजूनही आपली दुकाने व घर साफ सफाई करतांना दिसत आहेत.होताचे नव्हते झाल्याने काही लोकांचे संसार उद्धवस्त व उघडायावर पडलेले आहेत.
www.konkantoday.com