
चिपळूण शहरातील नारायण तलाव झाला नो प्लास्टीक झोन
चिपळूण शहरातील नारायण तलावाच्या सुशोभिकरणाचे काम २० टक्के शिल्लक असतानाही सध्याचे त्याचे रूप सर्वांना भुरळ घालत आहे. त्यामुळे हे सौंदर्य कायम टिकून राहण्यासाठी नगर परिषदेने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांपासून येथे दिवसा सुरक्षारक्षकांचा पहारा राहणार आहे. तसेच हा परिसर नो प्लास्टिक झोन म्हणून घोषित केला असून प्लास्टिक टाकण्यासाठी प्रवेशद्वारावर दोन पिंजरे बसवण्यात आले आहेत. तरीही परिसरात प्लास्टिक टाकल्यास ५०० रुपयांचा दंड होणार आहे.www.konkantoday.com