आर्थिक तोटा कमी व्हावा या उद्देशाने एसटी महामंडळामार्फत लांब पल्ल्याच्या फेर्या सुरू
प्रवासी भारमान वाढवून आर्थिक तोटा कमी व्हावा या उद्देशाने एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत लांब पल्ल्याच्या फेर्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने अत्यावश्यक सेवेंतर्गत असलेली एसटी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, सेवकवर्ग यांच्याकरिता फक्त एसटी फेर्या सोडण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असलेल्या भागातील फेर्या अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अनलॉक अंतर्गत पूर्ववत सुरू झालेल्या एसटी फेर्यांना प्रवाशांकडून हळुहळू चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
www.konkantoday.com