सागरी सीमा मंचच्या गुरुपुष्पांजली स्पर्धेत राजाराम परब प्रथम
रत्नागिरी: सागरीसीमा मंच, कोकण प्रातं आयोजित, आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ यांच्या सहयोगाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून
भव्य कोकण विभागिय ऑनलाईन भजन रत्नांची मांदियाळी, भजनसम्राटांना *गुरू पुष्पांजली स्पर्धा २०२१या स्पर्धेचा निकाल जाहीर आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यातील भजन, नमन, जाखडी, कला-क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ देण्याचे प्रयत्न गेली कित्येक वर्षे सातत्याने करत आले आहे. यावर्षी जिल्ह्यातील *भजन* क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आभार संस्था यु ट्यूबच्या माध्यमातून तळागळातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले जात आहे. म्हणूनच कोकणातील नामवंत भजन सम्राट बुवा वै. स्नेहल भाटकर बुवा वै.वामन खोपकर बुवा कोकणकला भूषण भजनसम्राट वै .चंद्रकांत कदम बुवा भजन महर्षी वै .परशुराम पांचाळ बुवा संगीतरत्न वै.विलास पाटील बुवा वै. भजनसम्राट जयराम घाडीगांवकर बुवा रायगड भूषण वै. गजानन पाटील बुवा (कर्जत) भजनसम्राट वै. दशरथ मयेकर बुवा,वै. भजनसम्राट चिंतामणी पांचाळ बुवा या भजन रत्नानी हा वारसा जपला वाढवला म्हणूनच” सुरक्षित किनारपट्टी, समर्थ भारत“ या सागरी सीमा मंच च्या ब्रीद वाक्यानुसार सागरी किनारपट्टीवरील कलाकार व व सर्वासाठी भजन रत्नाची मांदियाळी, भजन सम्राटांना गुरु पुष्पांजली.. भव्य ऑनलाईन कोकण विभागीय भजन स्पर्धा
या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा प्रसंगी सागरी सिमा मंचचे प्रांत संयोजक श्री संतोषजी पावरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने मा स्वप्नीलजी सावंत (दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक). मंडळाचे अध्यक्ष मा साईनाथजी नागवेकर, श्री शंकर उर्फ दादा वाडेकर श्री प्रविण सावंतदेसाई बुवा श्री संजय मेस्त्री बुवा ,श्री एकनाथ पंडये बुवा, श्री राकेश बेर्डे बुवा ,श्री प्रसाद राणे बुवा, श्री.वासुदेव वाघे बुवा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तळागाळातील मच्छिमार बांधवांना पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणूनच या कोकण किनारपट्टीवरील भजनी कलाकारांना सर्वाच्या बरोबर सहभाग घेता यावा म्हणूनच या स्पर्धेचे पालकत्व सागरी सीमा मंचने स्विकारले व यापूढेही असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत असे उद्गार स्वप्नीलजी सावंत यांनी काढले यावेळी सर्वाचे स्वागत करून तज्ञ परिक्षकांचेही आभार मानण्यात आले यावेळी पुढिल प्रमाणे बक्षिसे जाहिर करण्यात आली मुख्य स्पर्धा निकाल 1)लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ विक्रोळी बुवा श्री राजाराम परब 2)विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ आागर नरळ बुवा श्री मारुती मेस्त्री औख3)श्रीगांगो माऊली प्रसादिक भजन मंडळ खार बुवा श्री संतोष लाड उत्तेजनार्थ श्री गावदेवी प्रसादिक भजन मंडळ( बदलापूर) बुवा श्री अक्षय जमदरे श्री लक्ष्मी म्हंकाळी प्रासादिक भजन मंडळ लांजा बुवा कु भैरवी जाधव हनुमान प्रसादिक भजन मंडळ दापोली बुवा श्री अनिकेत वालावलकर श्रीपती बाबा प्रसादिक भजन मंडळ कोपरखळे बुवा श्री ज्ञानेश्वर म्हात्रे* लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ कल्याण बुवा श्री सागर तेरसे सर्वोत्कृष्ट लाईक (पुरुषगट)ब्रह्मदेव प्रासादिक भजन मंडळ उपळे राजापूर बुवा श्री केदार कदम नवोदित कलाकार एकविरा आई प्रसादिक भजन मंडळ कर्जत बुवा श्री गणेश चौधरी उत्कृष्ट पखवाज वादक श्री अभिलाश रसाळ (श्रीपती बाबा प्रसादिक भजन मंडळ पनवेल ) जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मुंबई श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडूप बुवा श्री सचिन कुडाळकर ठाणे स्वरश्री भजन मंडळ कल्याण बुवा सौ मंजिरी सावंत मुंबई उपनगर ग्रामदेवता प्रसादिक भजन मंडळ बुवा- श्री रुपेश पाटील रायगड जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ कर्जत बुवा श्री राजेश बोराडे रत्नागिरी वक्रतुंड प्रसादिक भजन मंडळ आडिवरे बुवा श्री संजय तारळकर सिंधुदुर्ग लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल बुवा श्री सूरज लोहार महिला सर्वोत्कृष्ट लाईक प्रथम क्रमांक बुवा-श्री आलिशा अविनाश वासावे द्वितीय क्रमांक सोमजाई प्रासादिक भजन मंडळ वरवडे बुवा कु कोमल वरवटकर तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजन मंडळ गोठीवली रायगड बुवा कुमारी गीतांजली उमाटे उत्तेजनार्थ आदिनाथसिद्ध महापुरुष भजन मंडळ मालवण बुवा कु दिव्या गोसावी स्पुर्ती भजन मंडळ दिवे आगर बुवा श्रीमती अनिता बापट परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली पुष्पांजली भजन मंडळ बुवा कुमारी स्वरा खरगांवकर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री *साईनाथजी नागवेकर व *श्री संतोषजी पावरी* साहेब ( प्रात संयोजक) सागरी सीमा मंच कोकण प्रांत यांच्या मार्गदर्शनाखाली बुवा लक्ष्मिकांत हरयाण श्री धनंजय मोसमकर श्री अनिकेत कोंडाजी साहेब
बुवा श्री प्रसाद राणे बुवा श्री. संजय सुर्वे बुवा श्री. निलेश मेस्त्री बुवा श्री. विनायक डोंगरे बुवा श्री. राकेश बेर्डे व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली या स्पर्धेनिमित्त सर्व रसिक श्रोते व मान्यवराचे आभार श्री वासुदेव वाघे यांनी मानले व सुत्रसंचलन श्री प्रविण सावंतदेसाई सर यांनी केले.
wwww.konkantoday.com