खेड तालुक्यातील पोसरे दरडग्रस्त कुटुंबावर शासन -प्रशासन अन्याय होत असल्याचा बहुजन समाज पार्टीचा आरोप
आज बहुजन समाज पार्टी, रत्नागिरी च्या वतीने खेड तालुक्यातील पोसरे दरडग्रस्त कुटुंबावर शासन -प्रशासन जो अन्याय करून सदर बाब गंभीरपणे घेत नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची भेट घेतली आणि सकारात्मक चर्चा केली.
पोसरे तील कुटुंबातील लोकांना दिलेले चार लाखाचे चेक परत घेतले त्याबाबत खेड तहसिलदार यांना विचारणा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले
*तात्पुरते पुनर्वसन चिपळूण येथे पाटबंधारे विभागाच्या काँलनी मध्ये करताना 16 कुटुंबातील लोकांना 8 घरे देउ त्यामध्येच 16 कुटुंबांनी व्यवस्था करावी असे प्रांताधिकारी सोनावणे यांनी सांगितले पण त्याबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी सोनावणेंसोबत चर्चा केली 16 कुटुंबातील लोकांना 16 घरे देण्याचा निर्णय प्रांताधिकारी यांना सांगितले.
*पुनर्वसन करताना पोसरे येथेच कायमस्वरूपी घरे द्यावीत अशी मागणी केली तेव्हा सदर जागेचा सर्व्हे करुन निर्णय घेऊ असे सांगितले.
*अंत्यसंस्कार करताना वेगळी मानसिकता दाखवली त्याबद्दल सदर बाब निवासी उपजिल्हाधिकारी याच्या निदर्शनास आणून देण्यात आली
*मुख्यमंत्री गुहागर हून रत्नागिरी गँस आणि वीज प्रकल्प च्या हँलिपँड वर उतरुन 45 ते 50 किलोमीटर अंतरावर चिपळूला येउन पूरग्रस्त भागात पाहणी करून जातात पण चिपळूण वरुन 30 किलोमीटर वर असणाऱ्या पोसरे मध्ये 17 लोक मृत्युमुखी पडले ही गंभीर बाब मुख्यमंत्रीनी दुर्लक्षित केले , अशा घटनेचा बहुजन समाज पार्टी च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सदर निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना भेट दिली त्यावेळी प्रदेश सचिव राजेंद्र आयरे, प्रेमदास गमरे, राजु जाधव, अनंत पवार, डी आर जाधव, बबलू जाधव आणि अनिकेत पवार उपस्थित होते.
www.konkantoday.com