अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या संशयित तरुणास ग्रामीण पोलिसांनी केली अटक.

रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील रस्त्याने चालत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या संशयित तरुणास ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. विकास विजय माने (वय २५)असे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) रात्री नऊच्या सुमारास घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास खेडशी परिसरात चालत जात असताना संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केले. तिने आरडा-ओरडा केला. त्यानंतर संशयिताने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्या संशयित तरुणास अटक केली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button