एनडीआरएफचे केंद्र रायगडमध्ये,रत्नागिरी जिल्ह्यातील नेते काय करीत आहेत -माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) केंद्र रायगड जिल्ह्यात मंजुरीसाठी पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कॉंग्रेसच्या माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील नेते काय करीत आहेत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
कोकणसाठी मध्यवर्ती असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात जर एनडीआरएफ केंद्र उभारले गेले तर त्याचा फायदा रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी देखील समांतर वेळेत होऊ शकतो. मध्यवर्ती ठिकाणामुळे विलंब टाळता येऊ शकतो याकडे सौ. खलिफे यांनी लक्ष वेधले आहे आहे.www.konkantoday.com