मदतीचा हात देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट कोकणात पोहचले
जोरदार अतिवृष्टीने कोकणाला जबरदस्त तडाखा बसला आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट कोकणात पोहचले. ही मदत देण्यासाठी डोंबिवली शिवसेना शहर शाखेने पुढाकार घेतला आहे.
खासदारांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कोकणातील पूरग्रस्त महाड, खेड, चिपळूण या भागातील नागरीकांना अन्नाधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाण्याचे वाटप केले. १६ ट्रक आणि एक एसटी महामंडळाची बस मदत साहित्य घेऊन ३०जुलै रोजीच कोकणात आली
www.konkantoday.com