नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.-खासदार संजय राऊत
प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. “वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू”, असं म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असताना दुसरीकडे नितेश राणेंनी केलेल्या टीकेचा देखील शिवसेनेनं समाचार घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंनी केलेल्या विधानावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.यावेळी नितेश राणेंनी केलेल्या टीकेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. “शिवसेना भवन हे आता कलेक्शन सेंटर झाले आहे”, अशी टीका नितेश राणेंनी केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच संजय राऊतांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागली असेल, असं मी वाचलं कुठेतरी. या सगळ्या विषयांवर आम्ही बोलण्यापेक्षा आमचे स्थानिक शाखाप्रमुख बोलतील. हा शाखाप्रमुखांच्या स्तरावरचा विषय आहे. कोण आहेत नितेश राणे? सोडून द्या”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलल्यानंतर लागलीच आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून खोचक शब्दांमध्ये एक सूचक ट्वीट केलं आहेमहाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालों को इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचं ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसं समजणार?” असं या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत.
www.konkantoday.com