संगमेश्वर येथील कॅनरा बँकेचे एटीएम मशीन फोडून पळून जाणाऱ्या आरोपीला केली पोलीसांनी अटक
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील कॅनरा बँकेचे एटीएम मशीन फोडून पळून जाणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलीसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ हजाराची रोख रक्कम व दुचाकी पोलीसांनी जप्त केली आहे. चोरीची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तर आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.संगमेश्वर पोलिसांनी हेमंत प्रमोद देसाई उर्फ हेमंत पांडुरंग देसाई (मुळ रा.मुंबई/ सध्या रा. चवे देऊड ता. जि. रत्नागिरी) याला अटक केली आहे
www.konkantoday.com