
चिपळूण येथील नाट्यगृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात,११ कोटी रूपये खर्च करूनही घ्यावा लागतोय प्लॅस्टिकचा आधार
नुकतेच नूतनीकरण झालेले चिपळूण येथील इंदिरा सांस्कृतिक केंद्र पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे
नूतनीकरणावर तब्बल ११ कोटी रूपये खर्च करूनही इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. थाटामाटात लोकार्पण झालेल्या या सांस्कृतिक केंद्राच्या छप्परावर चक्क प्लास्टिक कापड पसरवून
गळती थांबवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार माज़ी नगरसेवक इनायत मुकादम यांनी उघडकीस आणला आहे. त्यामुळे कोटयवधींच्या खर्चानंतरही प्लास्टिक कागदाचा आधार घ्यावा लागत असेल तर एवढ्या खर्चाचा उपयोग काय ? असा सवाल उपस्थित होत आहे उद्या छपरातून गळती झाली तर नूतनीकरण केलेल्या नाट्यगृहाची काय अवस्था होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी केंद्राच्या नूतनीकरणावरून वाद-विवादाचे महानाट्यही रंगले होते. नूतनीकरणाचे केवळ अडीच कोटीचे अंदाजपत्रक तब्बल ११ कोटींवर जाऊन पोहोचले. या कामात अनियमितता तसेच गैरव्यवहार झाल्याचा आरोपही झाला. त्याची चौकशी करण्याची मागणीदेखील झाली. शासकीय एजन्सीकडून थर्डपार्टी ऑडिट तसेच चौकशी करण्याची मागणी होत आहे नूतनीकरणासाठी 11 कोटी रुपये खर्च करूनही जर प्लास्टिक घालण्याची वेळ आली असेल तर इतका पैसा वाया गेला की काय असाही प्रश्नाचा उपस्थित केला जात आहे यास सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी इनायत मुकादम यांनी केली आहे
www.konkantoday.com