
सिंधुदुर्गमध्ये कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावरून दुचाकीस्वार वाहुन गेला
सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आल्याने कर्ली नदीवर असलेल्या सकल पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीस्वार पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावरून दुचाकीस्वार वाहुन गेला तर त्यांच्यासोबत असलेला सहकारी सुदैवाने बचावला. माणगांव येथून दुचाकीने दोन युवक शिवापूरला जात होते. या दरम्यान दुचाकी वसोली कुत्रेकोंड येथे आली असता त्यांनी पुलावरील पाण्याचा अंदाज न घेता पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला.पुलावरील पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दुचाकीसोबत एक तरूण पाण्याच्या प्रवाहाने खाली वाहत गेला तर त्याच्यासोबत सहकारी सुदैवाने बचावला. त्याने घटनास्थळी आरडाओरड केली मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. ग्रामस्थांनी शोधाशोध केली, मात्र सापडला नाही.