आता लसीकरणातही राजकारण , लसीकरणात राजकीय पदाधिकारी यांचा वाढता हस्तक्षेप
कोरोना आणि त्याच्या लसीकरणाचा वापर शिवसेना आपल्या निवडणूक प्रचारासाठी करत असल्याचे दिसून येत असून प्रशासनाला हाताशी धरून हे सगळं होत असल्याने लसींच्या वितरणात पक्षपात होत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे हे होत असताना आघाडीतील इतर दोन मित्रपक्ष गप्प आहेत .रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे तेथे येणाऱ्या २६०लसी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्य भागात नेल्या असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे
मिळालेल्या माहितीनुसार ३०/०७/२०२१ रोजी कोतवडे आरोग्यकेंद्र कोतवडे येथे रुग्ण कल्याण समिती व सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी आज. ३१/०७/२०२१ होणाऱ्या लसीकरणात कोतवडे गावाला ही लस मिळणार असून ही लस खरवते -१००, मिऱ्या – १०० व कासारवेली-६० अशी विभागून देण्याचे ठरवल्याचे कोतवडे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वास्तविक Covidshield ची दुसरी मात्रा कोतवडे गावात प्राधान्याने देणे आवश्यक आहे कोतवडे गावातील ग्रामस्थाना दुसऱ्या मात्रेसाठी वंचित ठेवल्याचा आरोप होत आहे.
शासकीय पत्रकातही कोतवडेचा उल्लेख असताना हा परस्पर लस नेण्याचा निर्णय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी घेतला कसा यावरून सोशल मीडियावर सुद्धा मेसेज फिरत आहेत
www.konkantoday.com