येत्या २ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

0
157

रत्नागिरी– ऑगस्ट 2021 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 2 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता दूरचित्रवाणी (व्हिडीओ कॉन्फरन्स) च्या माध्यमातून दुपारी 1 ते 2 वाजता या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनांत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात. अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रत्यक्ष अथवा gb_ratnagiri@rediffmail.com या ई-मेलवर सादर करावेत. विहीत नमुन्यामध्ये तसेच विहीत मुदतीत प्राप्त न झालेले अर्ज जिल्हा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here