
मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला
मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर येथे चांगलाच चोप दिला. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीच दिली आहे. उत्तर प्रदेशमधील या तरुणांनी मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना रंगेहाथ पकडलं आणि चोप दिला. त्यानंतर त्यांनी या चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
www.konkantoday.com