स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे चिपळूण पुरग्रस्तांना तात्काळ मदत
चिपळूण येथे आलेल्या नैसर्गिक आपत्ती नंतर स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे चिपळूण येथिल पुरग्रस्तांसाठी विविध वस्तू रूपाने त्वरित मदत करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचे सुचनेनुसार चिपळूण येथे पुरानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी संस्थेचे व्यवस्थापक श्री. मोहन बापट व उपव्यवस्थापक श्री. हेमंत रेडीज, चिपळूण शाखाधिकारी श्री. केतन ढवळीकर व इतर कर्मचारी हे स्वतः चटई, बेडशीट, टॉवेल, पिण्याचे पाण्याच्या बाटल्या व खाण्याचे सुके पदार्थ घेऊन चिपळूण येथे गेले व ही मदत पुरग्रस्तांना पोचवली. संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. संस्थेच्या चिपळूण शाखेच्या खातेदारांची संख्या मोठी आहे. यापैकी पुरग्रस्त सोनेतारण व इतर कर्ज खातेदारांसाठी संस्थेच्या संचालक मंडळ बैठकीत अधिकची काय मदत करता येईल याबाबत सुद्धा काही धोरणात्मक निर्णय अपेक्षीत आहेत.
www.konkantoday.com