इंदापूर वाडीतील पाच दिवसांपासून अडकलेल्या वीस ग्रामस्थांचे प्राण वाचवल्याबद्दल आमदार शेखर निकमांनी केले एनडीआरएफ टीमचे केले कौतुक

चिपळूण तालुक्यातील रिकटोली इंदापूरवाडी येथील २० ग्रामस्थ २२ जुलैच्या महाभयंकर पावसामुळे जमीन खचल्याने गावात अडकून पडले होते.त्यांची काल दिनांक २८ जुलै रोजी ५ एनडीआरएफ पुणे टीमचे असिस्टंट कमांडर जस्टीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली २२ जवानांनी सुखरूप सुटका केली.या ग्रामस्थांना एकमेव पायवाटेवरून देखील ये-जा करता येत नव्हती. अशावेळी त्यांना आवश्यक असणारी औषधे आणि आश्रय देण्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी एनडीआरएफचे जवान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची तत्परता दाखवली आणि हे सर्व वीस वयोवृद्ध नागरिक यांची सुटका झाली.
यासाठी याएनडीआरएफच्या टीमने पाण्यातून, डोंगरातून अवघड वाट काढून पाण्याचे झरे, तटबंदी मैदाने ओलांडून, अवजड खडकावर चढून या वयोवृद्ध ग्रामस्थांची निर्माण झालेली तीव्र गरज व सहायता दूर करण्याचे फार मोठे काम केले. आणि या ग्रामस्थांना सुरक्षित असलेल्या पर्यंत पोहचवण्यासाठी मदत केली. यावेळी जवानांच्या या अथक प्रयत्न साठी त्या गावातील नागरिकांनी अक्षरश: अश्रू गाळून त्यांचे आभार व्यक्त केले.त्याच सोबत या ग्रामस्थांना जीवावरील मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्परता दाखविणाऱ्या चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचे या नागरिकांनी खूप खूप आभार व्यक्त केले.याचसोबत आमदार शेखर निकम यांनी एनडीआरएफचे कौतुक केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button