१२ ते १८ वयोगटातील मुलांचे पुढील महिन्यापासून लसीकरण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. पार्श्वभूमीवर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांचे पुढील महिन्यापासून लसीकरण केले जाईल, असे सूतोवाच नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे.
www.konkantoday.com