
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं -नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com