
टाळेबंदीच्या आठ दिवसांत जिल्ह्याबाहेरून तब्बल आठ हजार ९०२ नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात
रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे एक जुलैपासून कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यात पुढेही वाढ करण्यात आलीहाेती आता काही प्रमाणात शिथिलता दिली गेली आहे मात्र या लॉकडाउनमध्ये जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली असूनही टाळेबंदीच्या आठ दिवसांत जिल्ह्याबाहेरून तब्बल आठ हजार ९०२ नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
www.konkantoday.com