चिपळूणात पूरग्रस्तांना मदत करणार्या दानशूर व सामाजिक संस्थांना आवाहन
चिपळूण मध्ये आज ज्यांचे नुकसान झालेले नाही ते पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील माणसे रस्त्याच्या कडेला उभे राहून , गाड्या अडवून मदत सरळसरळ हिसकावून घेत आहेत.आणि आपली घरे भरत आहेत….तर ज्याचे घर आणि ऑफिस, दुकान पुराखाली गेले आहे त्या व्यक्ती आपले घर , दुकान साफ करीत आहेत, त्यांचे पर्यंत खरोखरच मदत पोहोचत नाही. ते परिस्थितीशी झगडत आहेत, त्यांना कोणतीच जीवनपयोगी मदत मिळत नाही.
म्हणून ज्या बाहेरून येणारे व्यक्ती, संस्था, संघटना मदत घेऊन येत आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी बाधीत व्यक्तीच्या घरात जाऊन मदत करावी, रस्त्यावर आपली गाडी उभी करून मदत वाटू नये, कारण फार चुकीच्या पद्धतीने मदत दिली आणि घेतली जात आहे, पण जो पूरग्रस्त बाधीत आहे, तो मात्र मदतीपासून वंचित आहे.
तसेच चिपळूण शहराबाहेर खेर्डी गावात आतमध्ये जाऊन मदत करणे गरजेचे आहे, खेर्डी येथे शिवाजी नगर, शिगवण वाडी, भुरण वाडी, खताते वाडी, वरची पेठ, खालची पेठ* येथे घरोघर जाऊन मदतीचे वाटप व्हावे, ही विनंती दानशूर व्यक्ती, संस्था व संघटना याना करीत आहे.
त्याचबरोबर, पिंपळी, सती, खेर्डी, दळवटने, कळंबसते, गोवळकोट, उकताड त्याचबरोबर चिपळूण मधील शंकर वाडी, मुराद पूर, भोई वाडा, महाराष्ट्र हायस्कूल परिसर, बापट आळी, वड नाक, भोगाळे एस्टी स्टँड जवळ, बांदल हायस्कूल परिसर, बहादुर शेख वडार वाडी वसाहत* येथे घरोघर मदत जावी, अशी विनंती आहे.असे आवाहन करण्यात येत आहेत
गरजूंना मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहेत परंतु याही परिस्थितीचा फायदा घेणारे काही महाभाग आहेत त्यामुळे मदतीसाठी पुढे येणार्या दानशूर व्यक्तींनी रोख स्वरूपात मदत करणे टाळावे तसेच ज्या संस्थांमार्फत मदत करत आहात त्या संस्थांचे आधीचे कार्य पाहावे आज अनेक जिल्ह्यात चांगल्या संस्था आपल्या परीने काम करीत आहेत परंतु परिस्थितीचा फायदा उठवून काही नव्याने उगवलेल्या संस्था फायदा घेण्याची शक्यता आहे व त्यांच्याकडून दानशूरांकडून रोख रकमेची मागणी केली जात आहे त्यामुळे त्यांचा हेतू लक्षात घेऊन सावध राहणे आवश्यक आहे त्यामुळे रोख स्वरुपात जर मदत करायची असेल तर शासनाने आवाहन केलेल्या केंद्रावर द्यावी आपण करीत असलेल्या मदत गरजूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे यासाठी स्थानिक संस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या मदतीने गरजूंपर्यंत मदत पोहोचवावी असे आवाहन करण्यात येत आहे
www.konkantoday.com