रत्नागिरी नगर परिषदेचे चालले आहे तरी काय?
रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असताना ते अजूनही बुजावण्यात आलेले नाही मात्र ठरावीक व्हीआयपी भागात रस्त्यांच्या डागडुजीवर परत परत खर्च करण्यात येत आहे रत्नागिरी शिवाजीनगर येथील प्राईम डायग्नोस्टीक समोर दोन चर पडले होते नगर परिषदेने पहिल्यांदा दगड घालून बुजवले नंतर ते चर सिमेंट घालून बुजवण्यात आले आणि आता परत परत एकदा त्याठिकाणी दगड टाकण्यात येत आहेत त्यामुळे नगरपरिषदेच्या कारभाराबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे रत्नागिरी शहराच्या खालच्या भागात देखील लोक राहतात त्या ठिकाणचे सुद्धा आधी खड्डे बुजवण्यात यावेत आणि मग एका कामावर परत परत खर्च करावा अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत
www.konkantoday.com