धामणंद उपकेंद्र चालू करणेसाठी महावितरणच्या मदतीला एनडीआरएफची टीम धावली

धामणंद उपकेंद्र चालू करणेसाठी खेर्डी ते कळंबस्ते अशी वाशिष्टी नदीतून वीज वाहिनी नेणे आवश्यक होते. नदीला पाणी जास्त असल्याने ते शक्य होत नव्हते. चिपळूण चे कार्यकारी अभियंता श्री. लवेकर यांनी प्रांताधिकारी श्री. पवार यांचेशी संपर्क साधून NDRF ची टीम देण्यास विनंती केली. त्यानुसार NDRF ची टीम महावितरण च्या मदतीला आली आणि या टीमच्या मदतीने उप कार्यकारी अभियंता श्री. पालशेतकर व सहा. अभियंता श्री. सकपाळ व कर्मचारी यांनी सदरची वीज वाहिनी जोडण्याचे काम केले. त्यामुळे धामणंद उपकेंद्र चालू करता येईल व त्यामधून वीज पुरवठा सुरळीत करता येईल. या धाडसी कामाबाबत मुख्य अभियंता श्री. सायनेकर यांनी NDRF टीमचे व कर्मचारी/ अधिकारी यांचे कौतुक केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button