चिपळूण शहरातील निकृष्ट डांबरीकरण, ठेकेदारांना नोटीसा
चिपळूण शहरातील स्वामी मठ ते बहाद्दूरशेख नाका या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर एप्रिलमध्ये घाईघाईने केलेल्या डांबरीकरणाचे परिणाम पहिल्याच पावसात दिसले आहेत. निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे अवघ्या तीन महिन्यात या रस्त्यावर खडी पसरू लागली. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. या कामांसाठी एकत्रित सुमारे पाच कोटींचा निधी खर्च झाला. पालिकेने याची गंभीरपणे दखल घेत, संबंधित ठेकेदारांना नोटीसा बजावल्या आहेत. यातील स्वामी मठ ते बहादूरशेख नाका रस्त्याची दुरूस्तीची हमी संबंधित ठेकेदाराने घेतली आहे www.konkantoday.com