
मनाई असताना देखील एकत्रित नमाज पडणाऱ्या राजापूरातील पंधरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल
राज्यात सर्वत्र काेराेनाचा विषाणूंचा संसर्ग वाढल्याने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली आहे तसेच सर्व धार्मिक स्थळात एकत्र येण्यास बंदी केली आहे असे असताना देखील राजापूर येथील मापारी मोहल्ला येथे एकत्रित नमाज पडणाऱ्या पंधरा जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याती ल मापारी राजापूर हे मनाई हुकूम असताना देखील आदेशाचा भंग करीत मापारी मोहल्ला येथील गुळीकर मशिदीत एकत्रित बेकायदेशीर जमाव करून सायंकाळी साडेसात वाजता एकत्रित नमाज पडत होते ही गोष्ट पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन यातील पंधरा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन वारंवार एकत्र येण्यास मज्जाव करीत आहे तरी देखील अशा घटना घडत आहेत
www.konkantoday.com