ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण ओळखून तीन उच्चशिक्षित मित्रांनी आपल्या बचतीमधून सुरु केल ‘चहा-चपाती’ हॉटेल
नेहमीच्या मळलेल्या वाटेने जाण्याची नवीन वाट शोधल्यास त्याला हमखास यश मिळते असंच मार्ग “”चहा चपाती’
माध्यमातून पुण्यातील तरुणांना सापडला आहे
पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. इथे उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात येतात. खासकरून ग्रामीण भागात आजही सकाळी नाश्त्याला चहा-चपाती आवडीने खाल्ली जाते. बाहेरगावी आल्यावर मात्र विद्यार्थी ही गोष्ट आवर्जून मिस करतात. त्यांना मिळेल त्या नाश्त्यावर समाधान मानावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची हीच अडचण ओळखून तीन उच्चशिक्षित मित्रांनी आपल्या बचतीमधून नुकतंच ‘चहा-चपाती’ हे हॉटेल सुरू केलं आहे. त्यांच्या या हटके संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अक्षय चव्हाण, अक्षय भैलुमे आणि धनश्री पाटील यांनी पुण्यातील फर्ग्युसन काॅलेजसमोरील शिरोळे रोडवर हे अनोखं हॉटेल नुकतंच सुरू केलं आहे.करमाळ्यातील अक्षय चव्हाण आणि नवापूरची धनश्री पाटील हे फर्ग्युसन कॉलेजातील माजी विद्यार्थी तर कर्जतचा अक्षय भैलुमे याने सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये एमबीए केले आहेअक्षय चव्हाण म्हणाला, 2015 साली मी मास कम्युनिकेशनसाठी फर्ग्युसन काॅलेजात अँडमिशन घेतले. का@लेजच्या परिसरात सकाळच्या नाष्टय़ाला पोहे, इडली, मिसळ अशा गोष्टी मिळायच्या. परंतु आई ज्या प्रेमाने चहा-चपाती, तूप-चपाती सकाळच्या नाश्त्याला बनवून द्यायची ती गोष्ट मी इथे खूप मिस केली. या का@लेजात शिकणारे 70 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. हॉटेलात जाऊन चहा-चपाती कशी मागायची, हा प्रश्न माझ्यासारखा त्यांनाही पडतो. यातूनच ‘चहा-चपाती’ हॉटेल सुरू करण्याची आयडिया सुचली. आम्ही दोन वर्षे रिसर्च करून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. त्यानंतर व्यवसायात उतरलो.
चहा चपाती, तूप चपाती, साखर चपाती, जॅम चपाती, बटर चपाती, शेंगा पोळी असे तब्बल 32 प्रकारचे मेन्यू या हॉटेलमध्ये मिळतात. हॉटेलमधील सर्वात महागडा खाद्यपदार्थ हा फक्त 35 रुपयांचा आहे. पौष्टिक अन् सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडेल असे खाद्य पदार्थ देण्याचा आमचा उद्देश आहे. अल्पावधीत अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतोय. फक्त विद्यार्थीच नाही तर जे ग्रामीण भागातून पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत तेदेखील आवर्जून भेट देतात आणि यानिमित्ताने आपल्या गावाकडच्या आठवणीत रमतात, असे अक्षय सांगतो.