"विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण" या प्रगत संस्थेच्या अध्यक्षपदी माननीय श्री.महेंद्र सूर्यकांत शिवलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी पतसंस्थेच्या चिपळूण येथील प्रधान कार्यालयात सहकार खात्याकडून निवडणूक अधिकारी श्री.शहाजी व्हरकट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी श्री. महेंद्र शिवलकर यांचे नाव मानद सचिव श्री. राजेशजी शिंदे यांनी सुचवले व त्यास संस्था उपाध्यक्ष श्री. किशोरजी साळुंखे यांनी अनुमोदन दिले. तदनंतर उपस्थित सर्व संचालक मंडळाने श्री.महेंद्रजी शिवलकर यांच्या नावाला एकमताने पाठिंबा देऊन बिनविरोध अध्यक्ष निवड व्हावी असे सुचित केले. या निवडणूक प्रक्रिये दरम्यान तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी आणि सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी श्री. शहाजी व्हरकट यानी श्री. महेंद्र शिवलकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून अभिनंदन केले. ह्या कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. हरिश्चंद्रजी गुजर तसेच श्री .नितीनजी कोल्हापुरे ही ज्येष्ठ मंडळी आवर्जून उपस्थित होती. शुभेच्छा देताना श्री. हरिश्चंद्र गुजर यांनी नूतन अध्यक्ष श्री. शिवलकर ही एक प्रामाणिक व पारदर्शी व्यक्ती असून त्यांच्याकडे कृतिशीलपणा असून समाजकार्याच्या आवडी बरोबरच सहकारातील माहिती आहे. त्यामुळे अशी व्यक्ती ह्या प्रगत पतसंस्थेला निश्चितच यशो शिखराकडे नेतील आणि संस्थेची ध्येय धोरणे उत्तम रीतीने राबवून सभासदांचे हीत व जीवनमान उंचावतील असा विश्वास व्यक्त केला. विद्यमान संचालक मंडळ हे देखील सहकाराची जाण असणारे व प्रामाणिकपणे काम करणारे असून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री. नितीन कोल्हापूरे तसेच संघटनेचे प्रादेशिक सचिव श्री.संजयराव भोसले , झोन उपाध्यक्ष श्री महेंद्रजी पारकर, संचालक श्री .तुषार मायने ,संचालक श्री. अविनाश तावडे , तज्ञ संचालक श्री . बिपिनजी कोल्हापुरे, खेडचे डीव्हिजन सेक्रेटरी श्री. सचिनजी शेले, सर्कल संघटक निलेशजी खेतले, संस्था उपाध्यक्ष श्री .किशोरजी साळुंखे , डिव्हिजन अध्यक्ष चिपळूणचे श्री. मयूर पंडित यांची येथोचित भाषणे झाली. प्रत्येकाने श्री. शिवलकरांच्या कौशल्य गुणांचे व सर्वांना सोबत घेऊन सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून गुणगान केले व अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्मचारी वर्गाकडूनही अभिनंदन करण्यात आले. तसेच तांत्रिक संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. संतोषजी घाडगे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारताना श्री. शिवलकर यांनी सांगितले की या संस्थेच्या स्थापनेपासून जे आदर्श पाळले गेले, जी आर्थिक शिस्त लावली आहे त्याच चाकोरीतून मार्गक्रमण करून मी संस्थेचा कारभार पारदर्शी व विश्वासक पद्धतीने करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. त्यासाठी सभासद, सहकारी संचालक सदस्य आणि कर्मचारी वर्गाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. एकमताने बिनविरोध अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले .सदर कार्यक्रमाची संपूर्ण सूत्रसंचालन संस्थेचे अभ्यासू व कार्यतत्पर मानद सचिव श्री. राजेशजी शिंदे यांनी कुशलतेने करून कार्यक्रम यशस्वी केला. तसेच याकामी निवडणूक अधिकारी श्री . व्हरकट साहेब यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले संघटनेचे पदाधिकारी , सभासद या सगळ्यांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.