चिपळूण तालुक्यातील, सर्व वीज ग्राहकांना महावितरणकडून विनम्र आवाहन
दि. २२.०७.२०२१ रोजी झालेल्या महापुरामुळे चिपळूण मधील विशेषतः शहरी भागातील वीज वाहिन्या व रोहित्र यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पुरवठा टप्प्याटप्याने सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी ग्राहकांचा मेनस्विच व मीटर पाण्यात गेले होते. अशा परिस्थितीत सर्वांना विनम्र आवाहन आहे की मीटर व मेनस्विच भिजले होते त्याठिकाणी मेनस्विच व वायरिंगची मान्यता प्राप्त विद्युत ठेकेदाराकडून तपासणी करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा घाईने सुरू करू नये. मेनस्विच व वायरिंग सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतरच घरातील वीजपुरवठा सुरू करावा असे आवाहन चिपळूण महावितरण कडून करण्यात येत आहे.महावितरण, चिपळूण विभाग
www.konkantoday.com