
तर ‘हर हर महादेव’ चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत -सामन्या मधून भाजपवर टीका
आजच्या सामना अग्रलेखातून सध्याच्या सत्तेतल्या शिवसेनेवर आणि इथून पुढच्या सेनेच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसंच अंगावर याल तर हिशोबही चुकता करु, असा इशाराच विरोधी पक्ष भाजपला देण्यात आलाय. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’ चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील!
www.konkantoday.com