आपले मालक या मातीच्या ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर येतील या आशेने हा मुका प्राणी दोन दिवस सतत उभा आहे!

0
811

मुक्या प्राण्यांच्या प्रेमाविषयी आपण अनेक घटना बघत असतो आपल्या मालकाच्या घरात पाळलेल्या कुत्र्यांनी अनेकवेळा मालकाचे प्राण वाचविल्याच्याही अनेक घटना पण पहिल्या आहेत वेळप्रसंगी स्वत चे प्राण देऊनदेखील या मुक्या प्राण्यांनी आपल्या मालकाचे प्राण वाचवण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत आजदेखील खेड तालुक्यातील पोसरे गावात देखील अशीच हृदयद्रावक घटना उघड झाली आहे गाडले गेलेल्या मातीच्या ढिगार् यातून आपले मालक सुरक्षितरीत्या बाहेर येतील या आशेने हा मुका प्राणी गेले दोन दिवस उभा आहे
खेड तालुक्यातील मौजे पोसरे येथे दरड कोसळूनस सात कुटुंबातील काही कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत
एनडीआरएफचे जवान अनेक तास प्रतिकूल परिस्थितीतही सतत काम करू या भल्या मोठ्या कोसळलेल्या ढिगाऱ्यातून गाडल्या गेलेल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत एनडीआरएफच्या जवानांना यातील काही मृतदेह सापडले आहेत उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे असे असे असताना एका गाडल्या गेलेल्या घराजवळ त्या मालकांचा कुत्रा दोन दिवस उभा आहे एनडीआरएफच्या जवानांनी त्याला अनेक वेळेला बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु हा कुत्रा सतत तिथे उभा राहून आपल्या मालकाची वाट पाहत आहे मात्र त्याठिकाणी उभा आहे त्याठिकाणी त्याच्या मालकाचे घर हाेते या मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली त्याच्या मालकासह त्यांचे कुटूंब गाडले गेले आहे परंतु या कुत्र्याला आपले मालक परत येतील अशी आशा आहे त्यासाठी त्यांची वाट पाहत तो सतत एकाच जागी अनेक तास उभा आहे मुक्या प्राण्यांचे आपल्या मालकांवर किती प्रेम असते हे या हृदयद्रावक प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here