
मुंबई-पुण्याच्या धर्तीवर वालावलकर रूग्णालयात आता रेडिओ न्यूक्लिआईड थेरपीची व्यवस्था.
स्पेक्ट आणि पेट स्कॅन तसेच रेडिओन्यूक्लीआईड थेरपी या सुविधा मुंबई-पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होती. पण आता या आधुनिक सुविधा डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात उपलब्ध झाली आहे. अचून रोगनिदान व वेदनारहित प्रभावी उपचार हे या थेरपीचे वैशिष्ट्य सांगितले जाते. न्यूक्लिअर मेडिसिनचा सुसज्ज असा विभाग आपल्याकडे कार्यान्वित झाला असून या विभागामध्ये उपलब्ध असणार्या सर्व सुविधा या उच्च दर्जाच्या असून मोठ्या शहरांच्या तुलनेत जवळपास निम्म्या किंमतीत सर्व तपासण्या व उपचार उपलब्ध आहेत, अशी माहिती रूग्णालयाच्या संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली आहे.या सेंटरसाठी रामा पुरूषोत्तम फाऊंडेशन आणि कोटक महिंद्रा या सेवाभावी संस्थांनी भरघोज्ञ आर्थिक मदत देवू केली आहे. डॉ. अभय गोंधाणे हे न्युक्लियर मेडिसिन फिजिशियन असून न्यूक्लियर मेडिसिन विभागाचे काम पाहतात. या ठिकाणी ४५० हून अधिक रूग्णांनी ह्या सुविधांचा लाभ घेतला आहे.www.konkantoday.com