
मे महिन्याच्या मध्यावरच आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले.
यंदा मे महिन्याच्या मध्यावरच आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचा आर्थिक कणा मोडून पडला आहे. अवेळी आलेल्या व अद्याप थांबण्याचे नाव न घेणार्या पावसामुळे उशिरा आंब्याचे उत्पादन घेणारा आंबा बागायतदार पुरता नागावला गेला आहे. २५ मे रोजी दापोलीत १८७.५ मि.मी. पावसाची – नोंद करण्यात आली. जिल्ह्यात ३० हजार ६८ आंबा बागायतदार आहेत. जिल्ह्यात १ लाख १३ हजार हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. यातून दरवर्षी २ लाख ६० हजार ५०० मेट्रिक टन आंबा उत्पादन मिळते. हापूस आंबा कोकण आणि विशेषतः रत्नागिरीचा म्हणून प्रसिद्ध आहे. याची चव आणि गुणवत्ता यामुळे हा आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. ज्यामुळे मोठे परकीय चलनही मिळते. हापूस आंबा युरोप आणि आखाती देशांमध्ये पाठवला जातो. जिल्ह्याचा आर्थिक कणा मत्स्य उत्पादनाबरोबर आंबा उत्पन्नावर देखील अवलंबून आहे. अनेक आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित हे आंब्याच्या शेवटच्या हंगामातील दरांवर अवलंबून असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड परिसरात आंबा लवकर येतो. यामुळे तेथील आंब्याचा हंगाम लवकर संपतो. मात्र रत्नागिरी व उत्तर रत्नागिरीमध्ये आंबा उशिरा येतो.www.konkantoday.com




