दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे जोरदार छापे पडले आहेत. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीका केली आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.
www.konkantoday.com