Home स्थानिक बातम्या राज्यात मृत्यूदर जवळपास निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे चित्र मे महिन्यात निर्माण झाले होते...
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत जरी रुग्णसंख्या वाढलेली असली तरी मृत्यूदर जवळपास निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे चित्र मे महिन्यात निर्माण झाले होते. मात्र ते फसवे असून मृत्यूची नोंदच उशीरा झाल्याचे समोर आले आहे. अशा नोंद न झालेल्या ३,५०९ मृत्यूंची २० जुलै रोजी एकदम एकूण आकडेवारीत नोंद करण्यात आली. यातील जवळपास ९० टक्के मृत्यू हे मार्च ते जून या काळातील आहेत. अशा प्रकारे करोना मृत्यूंची विलंबाने एकदम नोंद करण्याची आरोग्य विभागाची ही दुसरी वेळ आहे.उशीरा नोंदणी केलेल्या मृत्यूंमधील सर्वाधिक- म्हणजे प्रत्येकी जवळपास ४०० हून अधिक मृत्यू हे नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील आहेत.
www.konkantoday.com