देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही -आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा ठरविलेली नाही”, या आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेतील उत्तरावरून काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. प्रश्नाच्या लेखी उत्तरात भारती यांनी सांगितले, की लसीकरण ही राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाच्या देखरेखीखाली चालणारी गतीमान प्रक्रिया आहे. कोरोनाचे सतत बदलणारे स्वरुप लक्षात घेता लसीकरण मोहिम पूर्ण करण्यासाठी निश्चित अशी कालमर्यादा ठरविता येणार नाही. असे असले तरी डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १८ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणे अपेक्षित आहे.
दरम्यान, ऑॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये लशीचे १३५ कोटी डोस उपलब्ध होणार असून लसीकरण मोहिमेवर आतापर्यंत ९७२५.१५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही भारती यांनी दिली.
www.konkantoday.com