महाड मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी केली हेलिकॉप्टरची मागणी
कोकणात पावसाचा कहर सुरुच आहे. चिपळूणपाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातील महाडमध्येही महापुराचं थैमान पाहायला मिळत आहे. महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. सावित्री नदीचं पाणी शिरल्यामुळे शहरातील सर्वच भागात ८ ते १० फुटाच्या वर पाणी साचलं आहे. अशावेळी बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम पाचारण करण्यात आल्या आहेत. पण सर्वच रस्ते बंद झाल्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना शहरात जाण्यास अडचणी येत आहेत. अशावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
www.konkantoday.com