कोकणातील गावांमध्ये सोडण्यात येणारा कोयनेचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला
गेल्या अनेक दिवसांपासून कोकणात पावसाचं धुमशान सुरू आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणातील गावांमध्ये सोडण्यात येणारा कोयनेचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय कोयनेतून वीजनिर्मिती तात्पुरती बंद केली आहे.
पुराची परिस्थिती असताना पुन्हा कोयनेच्या पाण्याची भर नको, म्हणून राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com