चिपळूणसह खेर्डी जलमय;चिपळुणात ढगफुटी

0
175

पेढे येथे दरड कोसळली, अनेक कुटुंबे पुरात अडकली

चिपळुणात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी, शिव नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाशिष्ठी नद्यांचे पाणी शहरात शिरले आहे. यामुळे जुलै २००५पेक्षा भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबे सध्या अडकली आहेत. पेढे येथे एका घरावर दरड पडून चारजण जखमी झाले आहेत. खेर्डी दातेवाडी येथे एक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले असून यामध्ये सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. चिपळुणात महापुरामुळे हाहा:कार माजला आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here