खाडी पट्ट्यात मदत कार्यासाठी तरुणांना तात्काळ बोट उपलब्ध करून द्या,गाव विकास समितीचे उपजिल्हाध्यक्ष मुझम्मील काझी यांची मागणी
ग्रामीण भागातील अनेक गावांचा,वाड्यांचा संपर्क तुटला
संगमेश्वर:- गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.अनेक नद्यांना पुर आलेला आहे.नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे.पुरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.खाडीपट्ट्यात असणाऱ्या गावांना धोका निर्माण झाला आहे.अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.मुख्य रस्तेच पाण्याखाली असल्याने मदतकार्यासाठी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.प्रशासनाने खाडीपट्ट्यात तरुणांना तात्काळ मदतकार्यसाठी बोट उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी गाव विकास समितीचे उपजिल्हाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी केली आहे.
www.konkantoday.com