विरोधी पक्षांतील राजकीय व्यक्तींना पशुपक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती-अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
विरोधी पक्षांतील राजकीय व्यक्तींना पशुपक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना पक्ष्यांची उपमा दिली असून भाजपच्या या कृतीला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा विरोधी पक्षांच्या लोकांना साप, विंचू व कधी कुत्रा बोलत आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत. यावरून त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
www.konkantoday.com