
मंत्रिमंडळ विस्तारात कोकणला स्थान मिळणार ?
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे हवा सध्या सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तसे बोलून दाखविले आहे जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर रत्नागिरी जिल्ह्याला त्यामध्ये स्थान असणार की नाही अद्याप स्पष्ट झालेले नाही जर रत्नागिरी जिल्हय़ाला प्रतिनिधीत्व मिळाले तर नेमकी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांना उत्सुकता आहे शिवसेनेचे उपनेते व कोकण माडाचे अध्यक्ष उदय सामंत हे जिल्ह्यातील मंत्रिपदाचे तगडे दावेदार मानले जातात परंतु त्यांना काही महिन्यांपूर्वी म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले होते म्हाडा अध्यक्षांचा दर्जा मंत्रीपदा सारखा आहे यामुळे या स्पर्धेत चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण व राजापूरच्या आमदार राजन साळवी यांच्यातच खरी चुरस आहे कदाचित मंत्रिपदाची माळ सामंतांच्या गळ्यातही पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले तरी मंत्रिपद मिळणाऱ्यांना सहा सात महिन्यांचा कालावधी मिळणार आहे