
मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळचे मुख्य कार्यालय मुंबईतच?
मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ व नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळचे वेवस्थापन करणाऱ्या अडाणी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड त्यांचे मुंबईस्तिथ मुख्य कार्यालय अहमदाबाद गुजरातला हालवल्याच्या चर्चा होत्या. या विरोधात राजकीय स्तरावरून तसेच अन्य क्षेत्रातून टीका झाल्या नंतर अडाणी समूहाने या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्टीकरण ट्विटर वरून दिले आहे.
मुंबई विमानतळ मुख्यालय अहमदाबादला हलवणार या बातम्या खोट्या आहेत. आम्ही निःसंशयपणे सांगतो कि MIAL व NMIAL विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहणार आहेमुंबईच्या अभिमानात भर घालत राहू हा आमचा शब्द आहे. आमच्या विमानतळांच्या साखळीतून आम्ही रोजगारांच्या हजारो संधी तयार करू,’ असं अदानी समूहानं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
