खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, जिल्हा रत्नागिरी, शाखाधिकारी निलेश जागकर यांचे निधन
शृंगार तळी गुहागर येथील विस्तारकक्ष येथे शाखाधिकारी म्हणून संस्था स्थापनेपासून कार्यरत असणारे निलेश जागकर यांचे अल्पशा आजाराने आज. ३९ व्या वृध्दी दुःखद निधन झाले.ध्येयाने झपाटलेली माणसे समाजासाठी मनापासून योगदान देतात यामध्ये कै.निलेश जागकर यांचे योगदान खारवी समाज पतसंस्थेत होते.संस्था स्थापन झाल्यानंतर विस्तार कक्ष संभाळण्याची जबाबदारी हाती घेतल्यानंतर संस्थेमध्ये संस्थेचा कारभार निटनेटका ठेवणे,ठेवी आणणे,तत्पर सेवा,ग्राहकांशी सौजन्याने वागणे या सर्व गुणांमुळे समाजात त्याची लोकप्रियता वाढली होती यामुळेच अल्पावधीतच विस्तार कक्ष शृंगारतळी येथील संस्थेचा चढता आलेख पहाता कै.निलेश जागकर यांनी संस्थेसाठी तळमळीने काम केल्यामुळेच हे शक्य झाले.
तरूण वयातच निलेश जागकर यांच्या जाण्याने खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेमध्ये पोकळी निर्माण झाली.सर्व समाजात लोकप्रिय म्हणून ओळखला जाणारा निलेश आज
आमच्यात नाही याचे अतिव दु:ख सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी यांना झाले आहे व सर्व समाजामध्ये यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
www.konkantoday.com