
रत्नागिरी जिल्ह्यासाठीची कोरोनवरची लस रात्री विशेष वाहनाने रत्नागिरीत दाखल
रत्नागिरी जिल्ह्यासाठीची कोरोनवरची लस काल रात्री विशेष वाहनाने रत्नागिरीत दाखल झाली या लसीचे प्रशासनापासून सामान्य जनतेपर्यंत सर्वजण वाट पाहत होते
कोरोना लस पुणे येथुन कोल्हापूरला आणली गेली. कोल्हापूर येथून विशेष व्हॅनद्वारे कोरोना लशीचे डोस रत्नागिरीत दाखल झाले
सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स ना ही लस देण्यात येणार असून त्याची रंगीत तालीम काही दिवसांपूर्वी यशस्वी पार पडली होती.कोरोना विषाणुवरील व्हॅक्सीनचे १६ हजार ३३० डोस रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहेत
१६जानेवारीला लस देण्यासाठी जिल्ह्यातील सहा केंद्र निश्चित केली आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांना डोस दिले जाणार असून त्यानंतर आशा, अंगणवाडी वर्कस्चा समावेश केला आहे. पहिल्या टप्प्यासाठी १४ हजार लोकांची निवड करण्यात आली आहे.पुढील लसीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे
www.konkantoday.com
