
सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन उठवा अन्यथा दोन दिवसांत रस्त्यावर उतरून दुकानं उघडी करू -भाजप खासदार संजय काका पाटील यांचा इशारा
कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी ठिक-ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या लाॅकडाऊननं अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हळूहळू कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना लाॅकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. अशातच आता भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दोन दिवसांत लाॅकडाऊन उठवण्यासाठी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन उठवा अन्यथा दोन दिवसांत रस्त्यावर उतरून दुकानं उघडी करू, असा इशारा भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे
www.konkantoday.com