राजापूर साईनगर या पुनर्वसन भागात घाणीचे साम्राज्य
———————————————–
कोविडमुळे शासन प्रशासन स्वच्छतेबाबत अधिक जागरूकता दर्शवित असताना राजापूर शहराचाच एक भाग असलेल्या साईनगर या पुनर्वसन भागात मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे तहसिलदारांच्या बंद असलेल्या शासकीय बंगल्यासमोरच तेथील नागरिक कचर्याचे ढिगच्या ढीग आणून ओतत असल्याचे चित्र आहे.
शहरातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेला साईनगर हा भाग कोदवली ग्रामपंचायत हद्दीत मोडतो. मात्र ग्रामपंचायत या भागातील नागरिकांना कोणतीच सुविधा पुरवत नसल्याचे नागरिकसांगतात konkantoday.com